सॅप-ईआरपी प्रणालीमुळे महावितरणचा मानव संसाधन विभाग ऑनलाईन, जलद, अचूक व मानवी हस्तक्षेपरहित झाला

MahaVitaran

नागपूर : वीज ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणने (MSEDCL) मानव संसाधन विभागाचे कामकाज सॅप-ईआरपी प्रणालीद्वारे नुकतेच सुरू केले आहे. त्यामुळे सुमारे ५४ हजार कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत सर्वच २२५ कार्यालयांमधील मानव संसाधन विभागाचे कामकाज या प्रणालीमुळे ऑनलाईन, जलद, अचूक व मानवी हस्तक्षेपरहित झाले आहे. यापूर्वी महावितरणच्या मानव संसाधन विभागामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीद्वारे (एचआरएमएस) कामकाज सुरू करण्यात आले होते.

यामध्येही मानव संसाधन विभागाचे कामकाज वेगवान झाले. त्याहीपेक्षा अधिक वेगवान व बिनचूक असलेली सॅप-ईआरपी प्रणाली लागू करण्याचा महावितरण व्यवस्थापनाने निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ही प्रणाली लेखा विभागासाठी सुरू करण्यात आली व त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू  झाली. त्यानंतर मानव संसाधन विभागासाठी सॅप-ईआरपी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विशेष लक्ष घालून वेग दिला. महावितरणच्या मुख्यालयातील महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे, महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) राजेश भालेकर व उपमहाव्यवस्थापक सुजाता देसाई व सहकाऱ्यांनी राज्यातील प्रादेशिक कार्यालय, परिमंडल, मंडल व विभाग अशा एकूण २२५ कार्यालयांतील मानव संसाधन विभागाचे कामकाज सॅप-ईआरपी प्रणालीद्वारे सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ही प्रणाली लागू करण्यापूर्वी महावितरणचे विविध नियम तसेच नियमावलीसोबतच मानव संसाधन विभागाशी निगडित संस्था व्यवस्थापन, वैयक्तिक प्रशासन, नूतनीकरण, वेळ व्यवस्थापन, पे-रोल, उच्च वेतनश्रेणी लाभ, प्रशिक्षण, परीक्षा, तपास, बदली, शिस्तभंग कारवाई, गोपनीय अहवाल, अपघात व्यवस्थापन, मालमत्ता व्यवस्थापन, न्यायप्रविष्ट  प्रकरणे, सतर्कता, श्रम आणि औद्योगिक संबंध यासारख्या प्रक्रिया अनेक प्रशिक्षण तसेच व्हिडीओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून जाणून घेण्यात आल्या.

महावितरणच्या मानव संसाधनमधील सॅप-ईआरपीची अंमलबजावणी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या  माहे मे महिन्याच्या  वेतनाची प्रक्रिया पूर्ण करून सुरू झाली आहे. सॅप-ईआरपी प्रणाली वेगवान व अचूक आहे. सोबतच प्रत्येक क्रिया एकाधिक प्रभाव देत असल्याने एकाधिक नोंदीची कामे टाळली जाणे शक्य आहे. सॅप-ईआरपीमध्ये प्रत्येक क्रिया स्वयंचलित असल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचे दावे वेळेवर मिळणार आहेत. या प्रणालीत मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळण्यात येतो. त्यामुळे महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना सॅप-ईआरपी प्रणालीद्वारे आता वेतन, भत्ते व इतर आनुषंगिक फायदे यासारख्या सेवा जलद मिळणार आहेत. सकाळ ८ ते दुपारी १ या वेळात बंद प्रणाली राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button