संतोषने घातली टोपी

Santosh Juvekar

अभिनयातील बाप असलेले दादा कोंडके (Dada Kondke) यांनी सांगून ठेवले आहे की मराठी भाषा जशी वळवाल तशी वळते. मराठी भाषेतली ही गंमत दादा कोंडके यांच्या सिनेमातून वर्षांनुवर्षे त्यांच्या चाहत्यांनी भाषेची गुगली अनुभवली आहे. सिनेमातच नव्हे तर इतर वेळेला देखील मराठी भाषा बोलताना तिच्यातला जर मिश्कील अर्थ समजला नाही तर एक वेगळीच मजा येते. अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) याच्या सोशल मीडिया पेजवर नुकताच त्याने पोस्ट केलेला फोटो बघितल्यानंतर संतोषने घातली टोपी हे कॅप्शन वाचून त्याचे चाहते देखील असेच बुचकळ्यात पडले.

अभिनेता संतोष जुवेकरने त्या अर्थी कुणालाही टोपी घातलेली नाही किंवा कोणालाही फसवलेले नाही तर घरातला पसारा आवरताना त्याला एक टोपी सापडली आणि ही टोपी त्याने कधीकाळी गोव्याला गेलेला असताना खरेदी केली होती. मग काय विचारता टोपीला बघून त्याला गोव्यात केलेली मजा तर आठवलीच पण ही टोपी घालून पुन्हा एकदा फोटोसेशन करण्यात संतोष रंगून गेला. संतोषनेही टोपीची मजा मस्ती आणि त्यासोबत खास मराठी भाषेत लिहिलेल्या ओळी सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या संतोष लंडनमध्ये त्याच्या नव्या सिनेमाचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे.

अभिनेता लोकेश गुप्ते हा सिनेमा दिग्दर्शित करत असून या सिनेमात संतोष सोबत मराठी सिनेमाची अप्सरा अर्थातच सोनाली कुलकर्णी हीदेखील दिसणार आहे. सध्या संतोष त्याच्या लंडन शूटिंग वारीमध्ये इतका रंगून गेला आहे की त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक फेरफटका मारला तर आपल्यालाही लंडनची सफर होऊन जाईल इतके छान छान फोटो तो शेअर करत आहे. शिवाय लोकेश गुप्ते हा त्याचा मित्रच हा सिनेमा दिग्दर्शित करत असल्याने लोकेश अभिनेता म्हणून , मित्र म्हणून आणि दिग्दर्शक दिग्दर्शक म्हणून किती वेगळा आहे हे देखील संतोष या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहे. तसेच जरी संतोष लंडनमध्ये असला तरी वेगवेगळे फोटो, किस्से आणि कॅमेर्‍याची धमाल-मस्ती यानिमित्ताने तो त्याच्या भारतातल्या मुंबईतल्या आणि गडहिंग्लज मधल्या त्याच्या गावाकडच्या मित्रांशी देखील कनेक्ट आहे.

आपण कितीही सेलिब्रिटीचे वलय मिरवत असलो तरीदेखील एका पॉईंटवर आपण एक तुमच्या आमच्यासारखा नेहमीचा मुलगाच असतो असं सांगत संतोषने त्याच्या टोपीचा किस्सा देखील ओठावर आणला. लंडनला जाण्यापूर्वी त्याच्या रूमची साफसफाई करत असताना त्याला एक काळया रंगाची hat स्टाईल टोपी सापडली. ही टोपी त्याने एकदा गोव्याला गेला असताना या टोपीची खास खरेदी केली होती. या टोपी सोबत त्याचे गोव्यातले अनेक क्षण त्याला यानिमित्ताने आठवले. मग काय टोपी घालून त्याने फोटोसेशन करत सोशल मीडियावर पुन्हा एकदा आठवणी शेअर केल्या. यापूर्वी देखील अनेक कलाकारांना दिवाळीची स्वच्छता करत असताना किंवा गणपती घरी येण्यापूर्वी डेकोरेशन करण्यासाठी घराची आवराआवर करत असताना अनेक जुन्या गोष्टी सापडल्या आणि त्यांनी शेअर देखील केल्या होत्या.

चाहत्यांना कलाकारांच्या आठवणींचे किस्से ऐकण्याची नेहमीच उत्सुकता असते. त्यामुळे जेव्हा कलाकार त्यांच्या आठवणीच्या वस्तू सोशल मीडियावर पोस्टच्या रूपाने शेअर करतात तेव्हा त्यांना देखील कंमेंट केल्याशिवाय राहवत नाही. म्हणूनच जेव्हा संतोष नेही कधीकाळी त्याने गोव्यात खरेदी केलेली टोपी सापडल्यानंतर ती घालून वेगवेगळ्या पोज मधले फोटो शेअर केले तेव्हा देखील चाहते त्याच्यावर बेहद खूष झाले. काही महिन्यांपूर्वी अभिनेता शशांक केतकर याला देखील त्याच्या बालपणीतलं खेळणे सापडलं होतं आणि त्याच्या सोबत त्याने नव्याने फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर केले होते. संतोष जुवेकर ने घातलेली टोपी देखील त्याच्या गोव्याच्या आठवणी ताज्या करणारी ठरली आहे.

या गोजिरवाण्या घरात या मालिकेपासून लोकप्रिय झालेल्या संतोषनेही अनेक मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. असं सासर सुरेख बाई या मालिकेत मृणाल दुसानीससोबत झळकला होता तर वाय डी म्हणजेच इअर डाउन या मालिकेत देखील संतोषचा अभिनय भाव खाऊन गेला होता. मोरया, लहानपण देगा देवा, पिकनिक यासारख्या सिनेमातील संतोष जुवेकर च्या अभिनयाचा अंदाज हा त्याच्या अभिनयाच्या वेगळेपणाची साक्ष देणारा आहे.

मुळगाव गडहिंग्लज असले तरी संतोषचे शिक्षण मुंबईतच झालं. मजेशीर बाब ही की संतोषला नेहमीच पर्यटनाची खूपच आवड राहिली आहे. त्याला जेव्हा प्रश्न विचारतो की तुला फिरायला जाण्यासाठी सर्वात आवडता ठिकाण कुठलं ?तर त्याचे उत्तर हेच असायचं की त्याचं आवडते डेस्टिनेशन हे लंडन असेल आणि सध्या तो सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये त्याची पर्यटनाची हौस देखील मनसोक्तपणे भागवून घेत आहे. संतोषच्या लंडनमय पोस्टमध्ये ही टोपी घातलेली पोस्ट सध्या खूपच प्रेक्षकांची आवडती झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER