ईएसआयसी रुग्णालयाच्या उद्‌घटनासाठी केंद्रीय मंत्री गंगवार यांना खा. मंडलिक यांचे निमंत्रण

Sanjay Mandlik-Santosh Gangwar

नवी दिल्ली :  कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्ण वाढत असतानाच बेडची संख्या कमी पडत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य कामगार विमा हॉस्पिटलच्या (इएसआयसी) रुग्णालयाचे (ESIC Hospital) नुतणीकरण आणि सक्षमीकरण पूर्णत्वाकडे आहे. १० ऑक्टोबर २०२०रोजी केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar)यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. तसेच रुग्णालयात आवश्यक १० डॉक्टर आणि २५ वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध झाले असल्याची माहिती खा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी दिली.

ईएसआयसी येथे पहिल्या टप्प्यात ५० बेड रुग्णांसाठी उपलब्ध होत आहेत. हॉस्पिटल सक्षमीकरण आणि नुतणीकरणासाठी खा. मंडलिक यांनी १२ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. पुढील टप्प्यात अजून १०० बेडसह वैद्यकीय अधिकार आणि कर्मचाऱ्यांच्या सदनिकेचे काम करण्यात येणार आहे. १०० बेडसाठी ३० कोटी तर सदनिकेसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून निवीदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इएसआयसीच्या माध्यमातून १५० बेडची उपलब्धता होणार असल्याची माहिती खा. मंडलिक यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER