जनतेच्या हितासाठी रेल्वे प्रवास : मनसेच्या नेत्याची माहिती

Santosh Dhuri

मुंबई :  “आज सर्वसामान्य जनतेला कामावर जाताना त्रास सहन करावा लागतो. बसमध्ये गेलं तरी गर्दी, रस्त्यावरून गेलं तरी गर्दी, हा गर्दीचा त्रास जर वाचवायचा असेल तर रेल्वे प्रवास  सुरू करावा; पण घरात बसून जे सरकार चालवत आहेत, त्यांना याची काहीच काळजी नाही. त्यासाठी आम्ही मनसेतर्फे (MNS) २१ सप्टेंबरला रेल्वेने प्रवास करणार आहोत.

जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास. ” अशी माहिती मनसे नेते संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी दिली .दरम्यान मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल लवकर सुरू करा, अशी मागणी विशेषतः उपनगरात राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २१ सप्टेंबरला ‘जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास’ असे आंदोलन मनसेतर्फे केले जाणार आहे.


 
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER