संरा : भारत चीनवर मात करून बनला महिलांविषयक आयोगाचा सदस्य

pr un tirumurti

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेशी निगडीत आयोगावर भारताने चीनला पछाडून महिलांच्या स्थितीवर काम करणाऱ्या आयोगाचे सदस्यपद जिंकले. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी ही माहिती दिली.

भारताने प्रतिष्ठित ECOSOC मध्ये जागा मिळवली आहे. महिलांच्या स्थितीवर काम करणाऱ्या (Commission on Status of Women – CSW) आयोगाचा सदस्य म्हणून भारताची निवड झाली. लैंगिक समानता तसेच महिला सक्षमीकरणासाठी असलेली आमची वचनबद्धता आणि कार्यतत्परता दर्शवणारी आहे. याबद्दल आम्ही सर्व सदस्यांचे आभार मानतो” असे ट्वीट टीएस तिरुमूर्ती यांनी केले.

भारत, अफगाणिस्तान आणि चीन यांनी ही निवडणूक लढवली होती. भारत आणि अफगाणिस्तानने ५४ सदस्यांपैकी बहुतांश मते मिळवली. चीन निम्म्या मतांचा टप्पाही पार करू शकला नाही. पुढील चार वर्षे (२०२१ ते २०२५) भारत या आयोगाचा सदस्य राहणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, यावर्षीच चीन प्रसिद्ध “महिलांविषयक बीजिंग जागतिक परिषदे”चा २५ वा वर्धापन दिन साजरा करतो आहे. या पार्श्वभूमीवर चीनला हा मोठा झटका बसला आहे.

याआधी, भारताला जून महिन्यातच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व बहाल करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांनी भारताला बहुमताने मंजुरी दिल्याने आशिया कालखंडातून भारत बिनविरोध निवडून आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER