मुंबईत घर घेण्याचं या कलाकाराचं स्वप्न स्वप्नचं राहिलं

Sanjeev Kumar

मुंबईत आपलं स्वतःचं घर (Own house) असावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र मुंबईतील घरांच्या किमती पाहाता ते सगळ्यांनाच शक्य होत नाही. केवळ सामान्य माणसालाच नव्हे तर पूर्वीच्या कलाकारांनाही घराच्या किंमती परवडत नसल्याचे तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. बॉलिवुडमध्ये असाही एक यशस्वी अभिनेता आहे ज्याचे मुंबईत स्वतःचा एक आलिशान बंगला असावा हे स्वप्न शेवटपर्यंत स्वप्नच राहिले. आता तुम्ही म्हणाल कलाकार कोट्यावधी कमवतात आणि त्यांन घर घेता येणार नाही हे शक्यच नाही.

पण कदाचित संजीवकुमारचं नशीबच तसं असावं. हो त्या कलाकाराचं नाव संजीवकुमार (Sanjeev Kumar)  आहे. संजीव कुमारची मानलेली बहिण अंजू महेंद्रू यांनीच संजीवकुमारच्या घराचा किस्सा सांगितला होता. अंजू महेंद्रू यांनी सांगितले, मरेपर्यंत संजीवकुमारचे मुंबईत स्वतःचा बंगला असल्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. मुंबईत बंगला विकत घेण्यासाठी संजीव कुमार प्रयत्न करीत होते. त्यांना एखादा बंगला आवडला की त्याची किंमत विचारायचे. मात्र परवडत नसल्याने ते पैसे जमा करण्यास सुरुवात करायचे. पैसे जमा व्हायचे तोपर्यंत त्या बंगल्याची किंमत वाढलेली असायची. अनेक वर्षे हीच परिस्थिती होती. जेव्हा त्यांच्याकडे पैसे आले तेव्हा त्यांनी आवडता बंगला विकत घेतला.

पण म्हणतात ना नशिबातच संपत्ती नसल्याने तो बंगला काही कारणामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आणि संजीव कुमार यांच्या नावावर तो बंगला होऊ शकला नाही. न्यायालयात खटला सुरु असतानाच संजीव कुमार यांचे निधन झाले आणि मुंबईत स्वतःचे घर असण्याचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER