‘संज्याचं तोंड बेळगावात पण काळं झालं’, निलेश राणेंचा संजय राऊतांना सणसणीत टोला

Maharashtra Today

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत (Belgaum Lok Sabha by-election) भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले. मंगला अंगडी यांनी ४४०३२७ मतेप्राप्त करुन मोठा विजय मिळवला. तर या निवडणुकीत काँग्रेस हा दुसरा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना ४३५०८७ मते मिळाले आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना ११७१७४ मते मिळाली. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेनेने संपूर्ण ताकद लावली होती. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोड शो करत शेळकेंच्या विजयाचा दावा केला होता. मात्र शेळकेंच्या पराभवानंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे(Nilesh Rane) यांनी संजय राऊत यांच्यावर सणसणीत टोला लगावला.

‘संज्याचं तोंड बेळगावात पण काळं झालं, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेने जे मुंबईत मराठी माणसासोबत केलं तेच बेळगावात केलं. एका तरुण मुलाला पराभवाच्या घशात ढकलला आणि मराठी माणसाची समिती कमजोर केली. आता पुढच्या निवडणुकी पर्यंत त्यांच्याकडे बघणार नाही’, असा टोला निलेश राणे यांनी राऊतांना लगावला आहे.

तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरुनही त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि काँग्रेसला टोला हाणला आहे. ‘ममता बॅनर्जी जिंकल्या खऱ्या पण कशा जिंकल्या हे विसरून चालणार नाही. कृष्णकथा आणि चंडीपाठ व्यासपिठावर त्यांना म्हणावं लागलं. ममतादीदींना हिंदूंचा आसरा घ्यावाच लागला. लेफ्ट वाल्यांशी किंवा काँग्रेसशी लढताना त्यांना कधीही हिंदू आठवला नव्हता तो पहिल्यांदा आठवला हे काय कमी आहे’, असे म्हणत राणे यांनी टीकास्त्र सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button