संजयजी, तुम्ही ‘महाराष्ट्र’ नाही; मला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे; कंगनाने खडसावले

Sanjay Raut - Kangana Ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) टीका केल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला होता. कंगना मुंबईत आली तर तिचा ‘शिवसेना स्टाइल’ समाचार घेण्यात येईल, असा दावा केला होता. त्यानंतरही कंगनाने ट्विटरवर राऊतांना आव्हान दिलं आहे.

मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. कोणाच्या बापाची हिंमत असले तर मला अडवून दाखवा, असे खुले आव्हान तिने दिले होते. आज कंगनाने आणखी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यात संजय राऊतांवर झणझणीत टीका केली आहे.

या व्हिडीओमध्ये ती म्हणते – की यापूर्वी अमिर खान आणि नसरुद्दीन शहा यांनी येथे राहायला असुरक्षित वाटत असल्याचे म्हणाले होते. त्यांना कोणीच हरामखोर म्हटले नाही..मात्र तुम्ही मला मारण्याची धमकी देत आहात! देशात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत, त्यांचे अतोनात हाल होत आहेत..यामागे कोती मानसिकता कारणीभूत आहे..तुमच्या वागणुकीचा मी निषेध करते..यापूर्वी मी मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे..मात्र पालघर लिचिंग प्रकरणात आणि सुशांतच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी योग्य प्रकारे काम केले नाही, हे दिसते आहे. त्यामुळे मी बोलणार…संजयजी, मला अभिव्यक्त होण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझ्या देशात कुठेही जाण्या-येण्याचं स्वातंत्र्य आहे..तुम्ही ‘महाराष्ट्र’ नाही..त्यामुळे तुम्ही असे म्हणू शकत नाही की मी महाराष्ट्राची निंदा केली. दुसरी गोष्ट मला देशात कोठेही राहण्याचे स्वातंत्र्य आहे. या ९ तारखेला भेटू, असे आव्हानही तिने या व्हिडीओच्या शेवटी राऊतांना दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER