जिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी बदली

Aman Mittal & Sanjay Singh Chavan

कोल्हापूर : कोल्हपूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल (Aman Mittal) यांची लातूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नवी मुंबई जलस्वराज्य प्रकल्प संचालक संजयसिंह चव्हाण (Sanjay Singh Chavan) यांची नियुक्ती झाली. सामान्य प्रशासन विभागाच्या सुजाता सौनिक यांनी बुधवारी बदलीचे आदेश जारी केले. चव्हाण गुरूवारी (दि.२१) पदभार स्विकारणार आहेत.

अमन मित्तल यांची दोन वर्षापूर्वी सीईओ पदी नेमणूक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मित्तल यांची कोल्हापुरात जिल्हाधिकारीपदी नेमणूक होणार असल्याची चर्चा होती. मित्तल यांच्या बदलीचे आदेश आल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला. चव्हाण यांची १० नोव्हेंबर २०२० ला जलस्वराज्य प्रकल्प संचालकपदी बदली झाली होती.त्यात बदल करुन त्यांची कोल्हापूर जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली. चव्हाण हे मुळचे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील आहेत. त्यांनी यापूर्वी गडहिंग्लज आणि इचलकरंजी येथे प्रांत तसेच सांगली जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER