संजय राऊतांची भूमिका राम मंदिर विरोधी ; आशिष शेलारांचा हल्लाबोल

Ashish Shelar & Sanjay Raut

मुंबई :- भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला .

आधी म्हणायचे पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा. राऊत यांची भूमिका राम मंदिर (Ram Temple) विरोधी आहे, अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला.

सामान्य माणसाने दिलेल्या वर्गणीतून राम मंदिर उभं राहणार असेल, तर त्यांना खुपतंय. आयुष्यभर ज्यांना महापालिकेतील कंत्राटदारांच्या जीवावर स्वतःचा पक्ष चालवण्याची सवय आहे, त्यांना राम भक्तांकडून जमा केलेल्या वर्गणीच्या आधारावर होणाऱ्या राम मंदिराच्या कामात डोळेखुपी होणारच. 2024 च्या पराभवाची पायाभरणी संजय राऊत जाहीररित्या का मांडत आहेत?” असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.

ही बातमी पण वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता; निलेश राणेंचा हल्लाबोल

राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदनीय अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधू ते कारसेवक, किती नावे संघर्षाची, त्यागाची, समर्पित आयुष्याची घ्यावीत. या आंदोलनात ज्यांची केवळ राजकीय घुसखोरी होती, त्यांनाच राम मंदिराच्या भूमी पूजनाची पोटदुखी झाली होती. त्यांनाच आता “रामवर्गणी” डोळ्यात खूपत आहे. राम भक्त हो! मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे? असे ट्विटही आशिष शेलार यांनी केले आहे.

दरम्यान मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?” असा बोचरा सवालही शेलारांनी विचारला. देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी राम मंदिर बांधले जात आहे, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी भाजपला लगावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER