संजय राऊतांचा बेळगावात रोड शो; तुफान गर्दीत वातावरण झाले भगवामय!

Sanjay Raut - Maharastra Today
Sanjay Raut - Maharastra Today

बेळगाव – बेळगाव लोकसभा पोडनिवडणुकीचा प्रचारासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत मैदानात उतरले आहे . शिवसेनेकडून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेळके यांच्या प्रचारासाठी बेळगावमधील संयुक्त महाराष्ट्र चौकात व्यासपीठ उभारण्यात आले होते. मात्र यावेळी कानडी प्रशासनाने वीज घालवली. मात्र, या रोड शोमध्ये सामील झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी टॉच लावत रॅली सुरु ठेवली. यावेळी त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. राऊत यांनी तेथेच सभा घेतली यावेळी तेथील वातावरण भगवे राऊत यांच्या तडाखेबंद भाषणाने बेळगावमधील वातावरण भगवे झाले.

शुभम शेळके यांचं वय अवघे 26 वर्ष आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शुभम विक्रांत शेळके यांचा फॉर्म भरला होता. समिती कार्यकर्त्यांनी डिपॉझिट भरले. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे शुभम शेळके यांचा लहानपणापासूनच सीमाप्रश्न जवळचा संबंध होता.

शुभम शेळके यांनी आंदोलन जवळून पाहिले आहे. सीमाप्रश्नाची झालेली वाताहतीमुळे त्यांनी युवासेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. मागील पाच वर्षात शैक्षणिक उपक्रम, मराठी शाळांना मदत यासोबत सीमा आंदोलनात भाग घेतला.

युवा समितीने सीमा भागातील युवकांना एकत्रित करून, या चळवळींमध्ये युवकांना प्राधान्य दिले. त्यामुळेच आज शुभम शेळके यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button