मेट्रो कारशेडवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया…

Sanjay Raut

मुंबई :- मुंबई मेट्रो कारशेड जागेवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये चांगलाच संघर्ष सुरू झाला आहे. केंद्र सरकारने कांजुरमार्गच्या (kanjurmarg) जागेवरून आक्षेप घेतल्याने आता राज्य सरकार कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागलं आहे. राज्य सरकारचा किल्ला ठामपणे लढवणारे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मेट्रो कारशेड जागेवरून सुरू असलेल्या वादावर संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. यावर राऊत म्हणाले की, हा विषय राज्य सरकार हाताळत आहे. त्यामुळे यावर तेच प्रतिक्रिया व्यक्त करतील. असे म्हणत राऊत यांनी या विषयावर बोलणे टाळले आहे. भाजपचे नेते आशिष यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका केली होती त्यावर विचारलं असतानाही त्यांनी विषयाला बगल दिली. हा विषय सरकारचा आहे सरकार बोलेल असंही त्यांनी सांगितलं.

असे सांगत राऊत यांनी हे प्रकरण चिघळणार नाही याची काळजी घेतलेली दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER