संजय राऊतांचे भाकीत खरे ठरले, म्हणाले होते ‘ममता वाघीण, भाजपाला जागा दाखवेल’

Maharashtra Today

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांचे सरकार येणार, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी काही वेळेपूर्वीच माध्यमांशी बोलताना व्यक्त केले होते. आता मात्र त्यांचं भाकीत खरे ठरले आहे. कारण पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने १७५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने (BJP)१०३ जागांवर आघाडी मिळवली आहे.

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकालाबाबत संजय राऊत यांनी वेळोवेळी माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. भाजपने कितीही जोर लावला तरीही ममता बॅनर्जी यांचेच सरकार येईल. भाजपासारख्या मोठ्या पक्षासोबत ममता बॅनर्जी या वाघिणीसारख्या लढत आहेत. त्यांच्या खरंच कौतुक करायला हवे असे राऊत म्हणाले होते. आता हाती आलेल्या निकालानुसार ममता बॅनर्जी यांच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button