
मुंबई :- शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा यांना अंमलबजावणी संचनालयाने पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेच्या घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. यावर आता संजय राऊत यांनी भाजपला (BJP) खोचक टोला लगावला आहे.
संजय राऊत भाजपावर (BJP) निशाणा साधत म्हणाले की , मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपाचे लोक मला ईडीची (ED) नोटीस आल्याचं सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात,” असंही संजय राऊत यांना यावेळी सांगितले . मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
ही बातमी पण वाचा : आ देखें जरा, किसमें कितना है दम …, नोटीसवर संजय राऊत यांनी दिले आव्हान
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला