संजय राऊतांच्या कन्येच्या साखरपुड्याचे खास फोटो व्हायरल !

sanjay-rauts-daughter-Purvashi Raut engagement-with-malhar-narvekar

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कन्येचा साखरपुडा आज पार पडला. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत यांची कन्या पूर्वशी (Purvashi Raut) आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.

आज दुपारी बरोबर सव्वा बाराच्या मुहूर्तावर ग्रँड हयातमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी राऊत आणि नार्वेकर कुटुंबीयांखेरीज काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अत्यंत साध्या पण प्रसन्न वातावरणात हा सोहळा पार पडला.

साखरपुड्यासाठी पूर्वशी आणि मल्हार खास मराठमोळ्या वेषात आले होते. पूर्वशी यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. त्यांनी हातात शेला धरला होता. तर मल्हार हे पेशावाई पेहरावात आले होते. तर, संजय राऊत आणि राजेश नार्वेकर यांनी कुर्ता, सदरा परिधान केला होता. साखरपुड्यासाठीचा स्टेज अत्यंत साधापण आकर्षक करण्यात आला होता.

श्रीगणेशाच्या आकृतीच्या पृष्ठभूमीवर फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER