संजय राऊतांच्या लेकीचा साखरपुडा; बाप लेकीचा व्हिडिओ एकदा बघाच

Sanjay Raut - Purvashi Raut Video

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पुर्वशी हिचा नुकताच साखरपुडा झाला. या सोहळ्याला सर्वपक्षीय राजकीय मंडळींची मांदियाळी जमली होती. सोहळ्यात वडिलांनी लेकीचे लाड करतानाचा व्हिडीओ सोशल माीडियावर चर्चेत आला आहे. संजय राऊतांनी लेकीचे लाड करतानाचा हा व्हिडीओ आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांचे चिरंजीव मल्हार (Malhar Narvekar) यांच्याशी संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा (Purvashi Raut) साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे.

या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) संजय राऊत यांची गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती.

दरम्यान, घरच्या पहिल्याच मंगल कार्याला संजय राऊत यांनी राजकीय मतभेद बाजूला टेवून सर्वच पक्षांच्या दिग्गजांना आपल्या लेकीच्या आनंद सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थितीचीही विशेष चर्चा झाली. टीव्ही 9 ने हा व्हिडिओ दिला आहे.

सौजन्य : टीव्ही 9
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER