कोणीही या, मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच भगवा राहणार, संजय राऊतांचे मोदींना आव्हान

PM Modi- Sanjay Raut

मुंबई :- बिहार, हैदराबाद येथे झालेल्या निवडणुकीचा मुंबई महालिकेच्या निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही. आम्ही कसलेले पैलवान आहोत, कोनोही येऊ द्या, मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असे थेट आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Modi) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिले आहे.

एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, आम्ही कसलेले पैलवान आहोत. घाबरणारे नाहीत. या मैदानात कोणीही उतरु द्या, मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार हे १०० टक्के सत्य आहे. आणि कोण उतरवणार हा मोठा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी थेट आव्हान दिले.

यावेळी त्यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केलं. शेतकरी आमच्या संपर्कात आहेत. जर केंद्राने आमच्याशी संपर्क साधला तर २ मिनिटात आंदोलन संपेल, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधानांनी जर स्वतः हस्तक्षेप केला तर पाच मिनिटांमध्ये तोडगा निघेल. तुम्ही (मोदी) स्वतः चर्चा करा, बघा काय चमत्कार होतो.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“सरकारने जर मनात आणलं तर शेतकऱ्यांबरोबर बसून अर्ध्या तासांत हे प्रकरण मिटवू शकते. पंतप्रधानांनी जर स्वतः हस्तक्षेप केला तर २ मिनिटांमध्ये तोडगा निघेल. मोदीजी एवढे मोठे नेते आहेत, त्यांचे म्हणने सर्व लोकं ऐकतील. तुम्ही (पंतप्रधान) स्वतः चर्चा करा, बघा काय चमत्कार होतो. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या! ;   मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER