अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…

Sanjay Raut - Anil Deshmukh

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात १०० कोटीची वसुली करण्याचे सांगितले होते. त्यांच्या या आरोपानंतर अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुखांवर सीबीआयचा फास आणखीनच घट्ट होत चालला आहे. सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Filed-a-case-against-anil-deshmukh-cbi-raids-house-office) रॅट देशमुखांच्या घरासह जवळपास १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआय आपलं काम करत आहेत. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल. तेव्हा काय करायचं ते पाहू, असं म्हणत संजय राऊत यांनी वेळ मारुन नेली.

अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी चर्चा केली. सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाचा आदेश आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त देणे योग्य होणार नाही. देशमुखांनी आपलं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं राऊत म्हणाले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारही आपलं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली. ज्या दिल्लीत राष्ट्रपतींचं निवासस्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाचा कारभार चालवतात. त्या ठिकाणी गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजन संपल्यामुळे कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. कोरोनामुळे देशात अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवली आहे. देशात आरोग्यबाबत अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता हा नरक नाही तर काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या नागपुरातील घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयावर सीबीआयची छापेमारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button