ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच त्यांचा पक्षप्रवेश निश्चित : संजय राऊत

urmila-sanjay-raut

मुंबई :- अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेवर अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे, कदाचित उद्या त्यांचा पक्षप्रवेश होईल’, अशी घोषणाच राऊत यांनी केली आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी पत्रकारांनी ऊर्मिला मातोंडकर या सेनेत प्रवेश करणार आहे का? असं विचारलं असता राऊत म्हणाले की, ‘ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल.

दरम्यान ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी ऊर्मिला यांचा दारूण पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे ऊर्मिला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ऊर्मिला या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन ऊर्मिला मातोंडकरशी चर्चा केल्याची माहिती आहे .

ही बातमी पण वाचा : शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? संजय राऊत संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER