संजय राऊत यांचा काँग्रेसवर हल्ला मरतुकडा विरोधी पक्ष ओसाड गावची पाटीलकी

Sanjay Raut & Congress

शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारच्या शिवसेना मुखपत्राच्या अंकात थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला देशातील विरोधी पक्ष मरतुकडा झाला आहे आणि विरोधी पक्षाची अवस्था म्हणजे व्यवस्थित गावचे पाठीशी समजण्यासारखी झाली आहे अशी जोरदार टीका राऊत यांनी केली. राऊत यांच्या लिखाणावर आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मागे एकदा राऊत यांनी इंदिरा गांधी या त्या काळातील अंडरवर्ल्डच्या बादशहास भेटत होत्या असे विधान केले.ते त्यांच्यावर बुमरॅंग झाले होते.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आहे असे असूनही राऊत यांनी काँग्रेसचे वस्त्रहरण केले आहे. राऊत यांनी या अग्रलेखात म्हटले आहे की काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यूपीएचे भविष्य काय?”, हा भ्रम कायम आहे.सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत.राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेला एक महिने बळीराजा आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसला आहे. सत्ताधारी भाजपने त्यांची पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. विरोधी पक्षही बळीराजाची बाजू सरकारजवळ मांडण्यात पूर्णपणे यशस्वी झाला नाही या शब्दात राऊत यांनी काँग्रेसला चिमटे काढले आहेत.

“राहुल गांधी हे वैयक्तिकरीत्या जोरदार संघर्ष करीत असतात. त्यांची मेहनत वाखाणण्यासारखी आहे. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे. तृणमूल काँग्रेस, शिवसेना, अकाली दल, मायावतींचा बसपा, अखिलेश यादव, आंध्रात जगन यांची वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील चंद्रशेखर राव, ओडिशाचे नवीन पटनायक, कर्नाटकचे कुमारस्वामी असे अनेक पक्ष व नेते भाजपविरोधात आहेत. पण ते काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएत सामील झालेले नाहीत. हे सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत”, असं मत राऊत यांनी मांडलं आहे.

“आज वर्षभर झाले काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत व काँग्रेसचे हंगामी नेतृत्व करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत डोलारा चोख सांभाळला आहे, पण त्यांच्या भोवतीचे जुनेजाणते नेते आता अदृश्य झाले आहेत. मोतीलाल व्होरा, अहमद पटेल यांच्यासारखे जुनेजाणते पुढारी काळाच्या पडद्याआड गेले. अशा वेळी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, यूपीएचे भविष्य काय, हा भ्रम कायम आहे”, या शब्दात त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर भाष्य केले आहे

“सध्या एनडीएत कोणी नाही तसे यूपीएतही कोणीच नाही, पण भाजप पूर्ण बळाने सत्तेवर आहे व त्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखे भक्कम नेतृत्व व अमित शहांसारखे राजकीय व्यवस्थापक आहेत. तसे यूपीएत कोणी दिसत नाही. लोकसभेत काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद मिळवावे इतके संख्याबळ नाही. नुकतीच बिहारची विधानसभा निवडणूक झाली. त्यातही काँग्रेसची घसरगुंडी उडाली. हे सत्य झाकता येणार नाही. तेजस्वी यादव या तरुणाने जी झुंज दिली ती जिद्द काँग्रेस नेतृत्वाने दाखवली असती तर बिहारचे चित्र कदाचित बदलले असते.

प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा होते. ममता बॅनर्जींची कोंडी होते, महाराष्ट्रात ठाकरे सरकारला काम करू दिले जात नाही. कमलनाथांचे मध्य प्रदेश सरकार स्वतः पंतप्रधान मोदी यांनीच पाडल्याचा स्फोट भाजप नेते करतात. हे सर्व लोकशाहीला मारक आहे. त्याला जबाबदार कोण? मरतुकड्या अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष! देशासाठी हे चित्र बरे नाही, असेही या अग्रलेखात म्हटले आहे आपल्याच मित्रपक्षाला मरतुकड्या म्हणणारे राऊत यांना काँग्रेस पक्षाने स्पष्ट शब्दांत समज दिली पाहिजे आणि अशा पद्धतीने केलेले लिखाण यापुढे सहन केले जाणार नाही अशी तंबी त्यांना दिली पाहिजे असे मत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्र टुडेशी बोलताना व्यक्त केले.

“काँग्रेस नेतृत्वाने सारासार विचार केला नाही तर येणारा काळ सगळ्यांसाठीच कठीण आहे, अशी धोक्याची घंटा वाजू लागली आहे. विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून 30 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल”, असे नमूद करत संजय राऊत यांनी काँग्रेसला एक प्रकारे आत्मचिंतन आचा आणि पुनर्रचनेचा सल्ला दिला आहे आता हा सल्ला काँग्रेस कशा पद्धतीने घेते, त्यावर काय प्रतिक्रिया देते हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER