‘ठाकरे सरकार पाडण्याचा नाद सोडा, कोरोनाच्या लढ्यात उतरा’, संजय राऊतांचे विरोधकांना आवाहन

Sanjay Raut

मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. अशातच शिवसेनेचे (Shivsena) खासदार यांनी आज सकाळी कोरोना (Corona) प्रतिबंध लसीचा दुसरा डोज घेत विरोधकांना कोरोनाशी एकत्र लढण्याचे आवाहन केले आहे.

राऊत (Sanjay Raut) यांनी आज मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोज घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांना एकत्र लढा देण्याचे भावनिक आवाहन केले. सध्या कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीतील नेते कोरोनाला रोखण्यासाठी पुरजोर प्रयत्न करत आहेत. एकीकडे सरकार कोरोनाशी लढा देत आहेत तर दुसरीकडे विरोधक सरकारला पाडण्याचे विधान करत आहेत. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून ते सहजासहजी पडणार नाही, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. आणि सरकार पाडण्याचे प्रयत्न बंद करावे. त्यांनी ही सर्व ताकद कोरोनाच्या लढ्यात खर्च करावी. कोरोनाच्या लढ्यात सरकारला साथ द्यावी. कोरोनाचे राजकारण जाळून टाका आणि कोरोनाच्या लढ्यात उतरा, असे आवाहन राऊत यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button