आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, तर समोरून वार करतो ; संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut-devendra fadnavis

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पहाटेच्या शपथ विधीवर भाष्य केले.अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीचा आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता .

ही बातमी पण वाचा:- सत्ता असो वा नसो शिवसेना महत्वाची, पुण्यात ८० जागा लढवणार; संजय राऊतांचा एल्गार

त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर पलटवार केला . राऊत हे पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला .आम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही. समोरुन वार करतो असे ते विरोधी पक्ष नेत्याला उद्देशून म्हणाले . अजित पवार संध्याकाळपर्यंत परत येतील हे आम्ही त्यावेळीही सांगितले होते.आणि आम्ही पाठीमागुन खंजीर खुपसत नाही, समोरुन वार करतो अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार केला.याचवेळी त्यांनी माझं नातं शिवसेनेशी आहे. सत्ता असली किंवा नसली तरी आमचं नातं सेनेशीच आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकावं ही आमची भूमिका आहे. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करणार आहोत, असे राऊत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button