संजय राऊत, आता तुम्ही आणि शिवसेना कॉंग्रेसविरुद्ध आंदोलन करणार का? – आशिष शेलार

Sanjay Raut & Ashish Shelar

मुंबई : बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात पोलिसांनी हटवल्यानंतर सर्वच स्तरांवरून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) लक्ष्य केलं होतं. महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत. ते यायला तयार आहेत का विचारा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती.

आता संजय राऊतांच्या प्रतिक्रियेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “शिवसेनेने बेळगावात जाऊन आंदोलन जरूर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही, याचं उत्तर आधी द्यावं.” अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना खडसावले आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्हिडीओ ट्विट करत संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला, याचा आम्ही निषेध व्यक्त करतच आहोत. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या देशामध्ये, अखंड हिंदुस्तानामध्ये कधीही कोणी करता कामा नये, तो आम्ही होऊही देणार नाही. या सगळ्यामागे स्थानिक कॉंग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांची भूमिका आहे, पुतळा हटवण्याची आहे. कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या जारकीहोळी यांच्याविरोधात संजय राऊत तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का? असा आमचा तुम्हाला सवाल आहे, असे शेलार म्हणाले.

आंदोलन छत्रपतींसाठी करावं लागलं, तर परवानगीची गरज काय? शिवसेनेला विरोधी पक्षनेता आणि भाजपच्या परवानगीची गरजच का लागते, या प्रश्नाचे उत्तरही तुम्हालाच द्यावे लागेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्याच ठिकाणी आणि सन्मानाने जसे तहसीलदार आणि पोलीस पाटलांनी सांगितले, त्याच पद्धतीने झाला पाहिजे. कर्नाटकच्या सरकारला आमची विनंती आहे- अशा शब्दांत आशिष शेलार यांनी निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER