संजय राऊत नोटीसमुळे बिथरले, हादरले आणि घाबरलेही; आशिष शेलारांनी डिवचले

Ashish Shelar & Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने  (ईडी)  चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली. यानंतर संजय राऊत यांनी खूप थयथयाट केला.

यावर भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राऊतांना डिवचले, नोटीसमुळे संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरलेही आहेत! वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने वर्षा यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे.

भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वर्षा यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आशिष शेलार यांनी, नोटीसमुळे संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरलेही आहेत, अशी राऊतांची टिंगल करत त्यांना डिवचले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER