‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात छेवून दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना इशारा

Sanjay Raut

बेळगाव :- बेळगाव लोकसभा पोडनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यावर आला आहे. काल शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्नाटक सरकारने प्रचारसभेला परवानगी नाकारल्यानंतरही त्यांनी जंगी सभा घेतली. यावेळी त्यांनी कर्नाटक सरकार आणि सीमाभागात मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कन्नडिगांना निर्वाणीचा इशारा दिला. ‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात छेवून दांडा घालू’, अशा शब्दात संजय राऊत यांनी बेळगावमधील प्रशासनाला आणि कन्नडिगांना निर्वाणीचा इशारा दिला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी राऊत यांनी बेळगावात जंगी प्रचारसभा घेतली.

यावेळी राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर करण्यासाठी संपूर्ण बंगाल फिरत आहे. ममता दीदी अन्याय करत असल्याचं ते सांगत तेथील लोकांना आहेत. पण तुम्ही बेळगामध्ये काय घडतंय ते इथं येऊ नबघा, येथे हत्या होत आहेत. तुम्हाला पश्चिम बंगालमधील अन्याय दिसतो, मग बेळगावातील दिसत नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांनी मोदी-शाहांना विचारला. तसंच पंडित नेहरुंनी केलेली चूक दुरुस्त करा, असं आवाहनही राऊतांनी केलं.

दादागिरीची भाषा करण्यात आम्ही हिटलर आहोत. महाराष्ट्राने मनात आणलं आणि फक्त पाणी बंद केलं तर तडफड होईल. पण आम्ही तसं करणार नाही. कारण आमच्यात माणुसकी आहे. बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे इथं आता माकडांचं काम नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची ज्योत शुभमच्या निमित्तानं पुन्हा पेटल्याचं सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळकेला विजयी करण्याचं आवाहन राऊतांनी बेळगावातील मतदारांना केलं.

शुभमचं वय लहान असेल पण वजनदार व्यक्तिमत्व आहे. सीमाभागाचे वजन घेऊन तुला लोकसभेत जायचं आहे. शिवसेनेचे २१ खासदार आहेत आणि तू २२वा राहणार आहे, अशा शब्दात राऊतांनी शुभम शेळके यांच्या विजयावर दावा ठोकला. ही लढाई फक्त शुभमची नाही तर देशात जिथं जिथं मराठी माणूस आहे त्याच्या अस्मितेची आहे. शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा कर्नाटकापर्यंत आल्या असत्या. तुमची सुंता झाली असती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने रात्री काढता, लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राऊतांनी कन्नडिगांवर जोरदार हल्ला चढवला.

ही बातमी पण वाचा : नितीन गडकरी मराठी माणसांना खाली पाडण्यासाठी भाजपचा प्रचार करतील का?; संजय राऊतांचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button