संजय राऊतांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया; हृदयात बसवले दोन स्टेन

Sanjay Raut

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन स्टेन त्यांच्या हृदयात टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. खरं तर, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अँजिओप्लास्टी वेळी एकूण तीन स्टेन टाकण्यात आले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, डॉक्टरांनी तो स्टेन काढून त्या जागी नवा स्टेन टाकला आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेत एकूण दोन स्टेन टाकण्यात आले. डॉ. मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांनी ही शस्त्रक्रिया केली. तर शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांची प्रकृती स्थिर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

आणखी तीन ते चार दिवस संजय राऊत हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली लीलावती रुग्णलायात राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल २०२० ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

डॉ मॅथ्यू हे प्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. अजित मेनन हेसुद्धा मुंबईस्थित हृदयविकारतज्ज्ञ आहेत. यापूर्वीही डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांनीच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती.

संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस आढळले होते. संजय राऊत हे 11 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. लीलावती रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस असल्याचं आढळलं. त्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. लीलावती रुग्णालयात डॉ. मॅथ्यू यांनीच संजय राऊतांची अँजिओप्लास्टी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER