संजय राऊत उद्धव ठाकरेंचा पगारी माणूस, त्यांना भाजपविरोधात बोलावेच लागेल – निलेश राणे

Sanjay raut-Nilesh Rane

जळगाव : कुठलेही काम नसलेले शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दररोज सकाळी उठून महाराष्ट्रातील जनतेची मुख्य विषयावरुन दिशाभूल करतात. मराठा आरक्षण कायम राखण्यासाठी राज्य सरकार व त्यांचे वकील कमी पडले हा मूळ विषय लक्षातच घेत नाहीत. कोण संजय राऊत? संजय राऊत उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पगारी माणूस आहे. त्यांना आमच्या विरोधात बोलणे भागच आहे. त्यांनी महाराष्टासाठी काय केले? मराठा समाजाचा अपमान करण्याचे काम राऊत यांनी केले. मात्र, अद्याप माफी मागितलेली नाही, तो हीशोब आम्ही नतंर करू असा इशारा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दिला. जळगाव दौऱ्यावर आलेल्या निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका मांडली.

पुढे निलेश राणे म्हणाले, मुळात ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. सर्वोच्च न्यायालयात आवश्यक ती कागदपत्रे दिली नाहीत. पुरावे दिले नाहीत. त्यांनी बोगासपणा केला, तांत्रिक बाजू मांडल्याच नाहीत. जे मराठा आरक्षण भाजपाच्या फडणवीस सरकारने पाच वर्षे टिकवले, ते बिघडविण्याचे काम ठाकरे सरकारने केले आणि मराठा समाजाला असलेले आरक्षण गमावून बसले. मराठा समाजाला एकत्र करून त्यांचे तीव्र आंदोलन भाजपाच्या माध्यमातून उभे करणार असल्याचा इशारा देखील यावेळी राणे यांनी दिला.

मराठा आरक्षणाचा घोळ ठाकरे सरकारने केला आहे आणि आरोप केंद्र सरकारवर करीत आहेत. त्यांना हा विषयच समजलेला नाही. ठाकरे सरकारमध्ये या विषयाचा अभ्यास करणारा एकही व्यक्ती नाही. सुप्रीम कोर्टात आवश्यक असलेले संदर्भ, नोंदी सादर केल्याच नसल्याने आरक्षण टिकले नाही. अशोक चव्हाण या समितीमध्ये असल्याने आम्हाला खात्री होतीच की आरक्षण टिकणार नाही, नाकारले जाणार आणि तसेच झाले. हे जाणून बुजून केले गेले याबाबत माझ्या मनात शंकाच नाही अशा शब्दात निलेश राणे यांनी राज्य सरकारवर आरोप केलेत. मागास आयोग स्थापन करून मागासलेपणा सिद्ध करावा लागेल हेच ठाकरे सरकारला महिन्यापर्यंत माहीत नव्हते. केंद्राकडे बोट दाखविले जात असले तरी या बाबी राज्य सरकारने पूर्ण केल्या पाहिजे होत्या पण

उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना यात रस आहे, असे वाटत नाही, या सर्व कारणांमुळेच मराठा आरक्षणाचा विषय अडकला आहे. हातात कागद न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांना यातील एक मुद्दा देखील सांगता येणार नसल्याची टीकाही यावेळी निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीला जाणार आहेत, यावर बोलताना त्यांची आरती ओवाळायची का ? म्हणत ते घरातून बाहेर निघाले तेच खूप आहेत. असा टोलाही राणे यांनी लगावला.

मराठा समाजाला कुठे जावे ते कळत नाही. हात पसरून झालेत. आंदोलने करून झालीत. आता ठाकरे सरकार तीव्र आंदोलनाची वाट पाहात आहे. परंतु आता मात्र सरकारच्या मंत्राच्या घरात घुसून मराठे आपल्या हक्काचे आरक्षण घेतील, असा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला. भाजपच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्र करून एक तीव्र आंदोलन उभारण्याचे काम सुरू आहे. लवकरच भाजपतर्फे मराठा आरक्षणासाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. संभाजीराजे छत्रपती हे भाजपाचे खासदार आहेत. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत ठरविलेली तारीख ही पक्षाला विचारून ठरविलेली नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा की नाही, हा निर्णय पक्ष घेईल, अशी माहिती राणे यांनी दिली. राज्य सरकारने आतापर्यंत काय केले? असे प्रश्न राजेंनी ठाकरे सरकारला विचारावे असेही ते म्हणाले.

भाजपाकडून आमदार फुटू नये म्हणून सरकार पडेल असे सांगितले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केले होते. यावर बोलताना त्यांना बोलू द्या, तिथे त्यांना करमत नसेल म्हणून असे बोलतात असा टोला निलेश राणे यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button