शिवसेना खासदार संजय राऊतांनी ट्विट केला कॉमेडियन कुणाल कामरासोबतचा फोटो

Sanjay Raut tweeted a photo with Kunal Kamra

मुंबई : जकल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चर्चेत आहेत. यापार्श्वभूमीवर प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरानं (Kunal Kamra) ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टच्या दुसऱ्या सत्राची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुणालची ही इच्छा पूर्ण झाली आहे. नुकताच संजय राऊत यांनी कुणालसोबतचा फोटो ट्विट केला आहे.

राऊत यांनी हा फोटो शेयर करत आज कुणाल कामराला भेटलो असे कॅप्शन दिले आहे. या दोघांचे एकत्र फोटो पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान शिवसेनेची भूमिका मांडण्यामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेण्यासंदर्भात कुणाल कामराने एक ट्विट केले होते. “संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन. अन्यथा काही शक्यता नाही,” असे तो म्हणाला होता .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER