“…तर जनता माफ करणार नाही”; संजय राऊतांचा संभाजी भिडेंना टोला

Sambhaji Bhide-Sanjay Raut

मुंबई : उदयनराजे भोसले यांच्याबाबत राऊतांनी केलेल्या वक्तव्याविरोधात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी आज सांगली बंदची हाक दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी ट्विटवरून पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत यांनी केलेले हे ट्विट शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासाठी असल्याचे स्पष्ट होत आहे. संजय राऊत यांनी ट्विटवरून सांगली बंदच्या पार्श्वभूमीवर ट्विटवरून दोन ट्विट केले आहेत.

पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी ‘सत्यमेव जयते’ इतकंच लिहिलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी बंदमुळे राजकीय बेरोजगारांना कंत्राटी कामगार म्हणून काम मिळाल्याचा टोला लगावला आहे. “काही राजकीय बेरोजगारांना कंत्राटी कामगार म्हणून राज्यात काम मिळाले आहे. त्याचा लाभ त्या मंडळींनी जरूर घ्यावा. पण राज्य अशांत कराल तर जनता माफ करणार नाही.” असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान “सांगली बंद शिवसेनेविरोधात नसून छत्रपती परंपरेचा अवमान करणाऱ्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आहे. देशाला शिवसेनेच्या विचारांची नितांत गरज आहे,” असं शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती, संजय राऊतांना पदावरून हटवा – संभाजी भिडे

दरम्यान “सांगली बंद शिवसेनेविरोधात नसून छत्रपती परंपरेचा अवमान करणाऱ्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आहे. देशाला शिवसेनेच्या विचारांची नितांत गरज आहे. ” असं शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.