‘असा मोहरा कधी न जाहला पुढे न होणार… बाळासाहेब ठाकरे नाव जगात गर्जत राहणार’

Balasaheb Thackeray - Sanjay Raut

मुंबई :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज ८वा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने विविध राजकीय पक्षाचे नेते बाळासाहेबांच्या आठवणी जागवत आहेत तसंच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘असा मोहरा कधी न जाहला’, असं म्हणत आपल्या शीर्षस्त नेत्याला साष्टांग दंडवत घातला आहे.

‘असा मोहरा कधी न जाहला पुढे न होणार… बाळासाहेब ठाकरे नाव जगात गर्जत राहणार’, अशा शब्दात संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंसारखा अद्वितीय नेता होणं शक्य नाही. गेल्या आठ वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत साहेब आम्हाला पोरके करुन गेले, असे भावनिक उद्गार संजय राऊत यांनी काढले.

शिवसेना नेत्यांबरोबरच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बाळाासहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे अमोघ वक्ता, व्यंगचित्रकार व राजकीय भाष्यकार म्हणून कार्यकर्तृत्वही विशेष महत्त्वाचे होते. राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजिगीषु वृत्तीचे प्रकर्षाने स्मरण करणे क्रमप्राप्त आहे. पुण्यतिथी दिनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन…असे ट्विट पवारांनी केले आहे,

दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER