संजय राऊत जमाना बदलला, धमकावणे बंद करा : चंद्रकांत पाटील

Sanjay Raut- Chandrakant Patil

कोल्हापूर :- शिवसेनेचे आमदार प्रकाश सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावरून प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ‘खासदार संजय राऊत आता जमाना बदलला आहे. धमकावणे बंद करा’ या भाषेत दम भरला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (Chandrakant Patil) पाटील यांनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या वर्षभराच्या कारभारावरून हे स्पष्ट होत आहे की, सरकारमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले. सरकार नेमके कोण चालवतेय हेच समजत नाही.

पदवीधरमधील लढाई वनवे, शिक्षक मतदारसंघही जिंकणार

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील निवडणूक भाजपसाठी वनवे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव दिसू लागला आहे. शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही जिंकू.

ही बातमी पण वाचा : भाजपावर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नसेल! चंद्रकांत पाटलांचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER