आघाडी सरकारचे शिल्पकार संजय राऊतांनी विधानसभा अधिवेशनाचा सल्ला द्यावा – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil & sanjay Raut

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्ण संख्येवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. विरोधक सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) कार्यपद्धतीवर ताशेरे ओढताना दिसत आहे. अशातच शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल जी माहिती दिली. तशी गंभीर परिस्थिती महाराष्ट्रातही आहे. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा सल्ला त्यांनी आपल्या महाविकास आघाडी सरकारला द्यावा, असा खरमरीत टोला भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोरोनाच्या स्थितीवर ट्विट केले होते. ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असे राऊतांनी म्हटले होते. यावर बोलताना पाटील म्हणाले की, ही अभूतपूर्व स्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, सगळीकडे नुसता गोंधळ आणि तणाव आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे खरे आहे पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे. संपूर्ण देशात अशी स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली असती तर ते चांगले झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे बरे होईल. संजय राऊत हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आघाडी सरकारचे शिल्पकार आणि या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याचा सल्ला द्यावा, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : आम्ही रेमडेसिवीर पाकिस्तान किंवा चायनाला देतो काय? : चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button