
मुंबई :- शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे बोट धरून आम्ही पुढे आलोय. पवारांकडून आम्ही रोज प्रेरणा घेतोय. ‘तुम्ही होता म्हणूनच…’, असे म्हणत एकप्रकारे शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पवारांचे आभार मानत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांचे वय कोणी मोजू नये, असं सांगत पवार हे देशाचे नेते आहेत. भविष्यात त्यांना राष्ट्रीयस्तरावर मोठी संधी प्राप्त होवो, अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ऐंशीवा वाढदिवस आहेस. त्यानिमित्ताने संजय राऊत यांनी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचं भरभरून कौतुक केलं. पवारांकडून आम्हाला सतत प्रेरणा मिळत असते. त्यांचे बोट धरूनच आम्ही राजकारणात आलो आहोत. गेल्या पाच पिढ्यांना शरद पवार प्रेरणा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या वयाचा कोणी हिशोब करू नये. ते त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. सगळे तरुण फिके पडतील अशा प्रकारचं काम ते आजही करत असतात. त्यांच्याकडून आम्ही रोज प्रेरणा घेत असतो. त्यामुळेच त्यांच्या वयाचा हिशोब करणं हा त्यांच्यावर अन्याय ठरेल, असं राऊत म्हणाले.
साहेब,
तुम्ही होता म्हणूनी…
देशाचे नेते आदरणीय @PawarSpeaks
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/g9x17RthNg— Sanjay Raut (@rautsanjay61) December 12, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला