महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असले तरीही सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडेच : संजय राऊत

uddhav-sanjay raut

मुंबई :- देशाची अर्थव्यवस्था वर्षभरापासून संकटात आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. तसंच राहुल गांधी यांनी जे म्हटलं होतं की, आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत; मात्र आम्हाला अधिकार नाहीत त्याचं काय? त्यावर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार असलं तरीही सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी योग्यच सांगितले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत…

सध्याचा काळ राजकारण करण्याचा काळ नाही तर कोरोनाच्या संकटाला सामोरे  जाण्याचा काळ आहे. येत्या काळातही आम्हा सगळ्यांनाच राजकारण विसरून पुढे महाराष्ट्रासाठी काम करायचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात आली होतीच. गेल्या वर्षभरापासून ही अर्थव्यवस्था ढासळली आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगल्या गोष्टी केल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुकही केले आहे. मोदी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केले हे कौतुकास्पद होते, असेही राऊत म्हणाले .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER