पुण्याच्या लॉकडाऊनवरुन संजय राऊतांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

Sanjay Raut And Ajit Pawar

पुणे : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदीव वाढतच चालले आहे . इतकेच नाही तर पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असून शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चिंता व्यक्त केली . यातच पुण्यातल्या (Pune) लॉकडाऊनवरुन (Lockdown) त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे .

पुण्यातील लॉकडाऊन घाईघाईने उठवला, त्याला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता, पुण्याकडे पहिल्यापासून लक्ष देणं गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांचे मत होते , असे संजय राऊत म्हणाले आहेत.

पुण्यासारख्या ठिकाणी ऍम्ब्युलन्स मिळू नये, हे आरोग्य यंत्रणेचे निदर्शक आहे. सरकारने यापुढे काळजी घेणं महत्वाचे आहे. आता पुण्यामध्ये मुंबई पॅटर्न राबवण्यात येत आहे. तिकडे काही अडचणी असतील, तर त्या दुरुस्त करून जनतेला उत्तम सुविधा द्यायची जबाबदारी फक्त सरकार किंवा महानगरपालिकेची नाही, तर विरोधी पक्ष म्हणून सगळ्यांची आहे, असे वक्तव्य राऊत यांनी कले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER