…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी झाली असती; संजय राऊतांचे राज्यपालांवर टीकास्त्र

Sanjay Raut target-on governor Bhagat singh koshyari .jpg

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंगेरमधील हिंसाचारवरून भाजपा (BJP) आणि राज्यपालांवर (Bhagat singh koshyari) निशाणा साधला आहे. मुंगेरमधील हिंसाचार जर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा अन्य राज्यात झाला असता, जिथे विरोधकांची सरकारं आहे, तर केवढा मोठा गदारोळ झाला असता, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे .

मुंगेरमधील हिंसाचार अजून थांबलेला नाही आहे. पण सगळेच जण त्याच्यावरती गप्प आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले .

बिहारमध्ये निवडणुका सुरू आहेत. मुंगेरमध्ये दुर्गामातेच्या विसर्जनाच्या यात्रेत हिंसाचार झाला, दंगल झाली, त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये एक तरुण मारला गेला आणि अनेक लोक जखमी झाले. मुंगेर आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. हिंसाचार अजून थांबलेला नाही. पण सगळेच जण त्याच्यावरती गप्प आहेत. जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात आणि बिहारमध्ये जे निवडणुका लढवता आहेत. ते सगळे कसे गप्प आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER