ठाकरे सरकार टिकवण्यासाठी ‘ही’ व्यक्ती महत्वाची : संजय राऊत

Sanjay Raut And Ajit And Sharad Pawar

मुंबई : उद्धव ठाकरेंचे सरकार टिकण्यात कोणाची भूमिका महत्त्वाची हे सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे नाव घेतले आहे. सगळय़ात मोठे प्रश्नचिन्ह आहे ते अजित पवारांच्या भूमिकेविषयी. 80 तासांचे सरकार ज्यांनी फडणवीस यांच्याबरोबर स्थापन केले ते अजित पवार काय करतील? भाजपच्या सर्व आशा आजही फक्त अजित पवारांवरच टिकून असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

शरद पवार निश्चिंत असल्याने, सरकार ५ वर्षे टिकेल – संजय राऊत

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर घडलेल्या एकूण घडामोडी आणि त्यानंतर स्थापन झालेल्या महाआघाडीचे सरकार सत्तेत आले. बहुमत चाचणी जिंकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात केली. त्यानंतर होणाऱ्या नागपूर अधिवेशनात यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेले हे सरकार टिकणार नाही असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जात आहे . यावर संजय राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

दरम्यान पवार निश्चिंत आहेत तोपर्यंत सरकार स्थिर आहे. महाराष्ट्र निश्चिंत आहे. हे सरकार टिकवायचेच या एका निर्धाराने शरद पवार उभे आहेत. काळजी नसावी असेही राऊत यांनी म्हटलं आहे.