चंद्रकांतदादांचा तोल ढासळला, त्यांच्यावर उपचाराची गरज; आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेवर संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Chandrakant Patil-Sanjay Raut-Aditya Thackeray

ठाणे :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीका केली होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे . चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी टीका राऊत यांनी केली. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांतदादांवर निशाणा साधला. तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, असे राऊत म्हणाले .

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा उल्लेख केला. आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहितील, अशी टीका पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button