पद्म पुरस्कार नाकारल्याने संजय राऊतांचा केंद्रावर घणाघात

Sanjay Raut

मुंबई :- केंद्र सरकारने देशातील ११९ कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील सहा  जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून राज्य सरकारने शिफारस केलेल्या सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्य सरकारने शिफारस केलेल्या नावांच्या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव होतं. संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही पद्म पुरस्कारने सन्मानित करण्यात यावे यासाठी ठाकरे सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. मात्र, केंद्राने केवळ एकाच नावाला पंसती दिली असून इतर ९७ व्यक्तींना यंदा तरी पद्म पुरस्कारासाठी नाकारले आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्काराच्या यादीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले यासाठी योग्य ते असतील. त्यांचं मी स्वागत करतो. बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला असावा. महाराष्ट्र राज्य मोठं आहे. त्यात इतके लोक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. पण महाराष्ट्रातील केवळ सहा  जणांनाच पुरस्कार देण्यात आला आहे. राज्यातील १० ते १२ जणांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा फक्त सहाच जणांना पुरस्कार देता? ही नावं पाहून मला आश्चर्य वाटलं, असं संजय राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पी.टी. उषा म्हणतात, नाम्बियार सरांना पद्म पुरस्कार मिळायला उशीरच झाला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER