मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचे करू नये : संजय राऊत

sanjay-raut--devendra-fadnavis

मुंबई :- सरकारने मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासले आहे, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला . देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष सत्तेत होते. पोलिसांचं काम कसं चालतं हे त्यांना माहीत आहे. त्यांनी अशी भाषा करू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला. तसेच मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नका, असं आवाहनही त्यांनी केले.

संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये. कुणाचाही मृत्यू वाईटच असतो. मग तो अन्वय नाईक यांचा असो, नाईक यांच्या आईचा असो, मोहन डेलकर यांचा असो की मनसुख हिरेन यांचा असो. अनैसर्गिक मृत्यूचा तपास व्हायलाच हवा. त्यासाठी राज्याचे पोलीस आणि यंत्रणा सक्षम आहेत. विरोधी पक्षाने त्यावर शंका घेणं म्हणजे पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्यासारखं आहे.

त्यांच्याकडे पुरावे असतील आणि त्याची दखल घेतली जात नसेल तर त्यांनी वेगवेळ्या प्लॅटफॉर्मवर आवाज उठवला पाहिजे, असं राऊत म्हणाले. हिरेन प्रकरणाचा एनआयएला तपास करू द्या. एटीएसचा तपास सुरू आहे. निष्कर्ष आला नाही. घाईघाईत एनआयएला तपास देणं यात मला तरी काही तरी काळंबेरं असल्याचे दिसून येते, असा दावाही त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण दाबण्याचे ठाकरे सरकारचे प्रयत्न, आशिष शेलार यांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER