बिहारमध्ये तेजस्वीपर्वाची सुरुवात; मंगलराज सुरू होईल- संजय राऊत

Tejashwi Yadav - Sanjay Raut

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) मतमोजणीला सुरुवात होऊन आता काही तास उलटले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधन ही निवडणूक एकतर्फी जिंकणार, असे चित्र होते. मात्र, आता मतमोजणीच्या काही तासांनंतर भाजप्रणीत ‘एनडीए’ने जोरदार कमबॅक केल्याचे चित्र आहे. यावरून शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान दिले आहे, असा टोला लगावतानाच बिहारमध्ये तेजस्वीपर्व सुरू झाले आहे. बिहारमध्ये आता तेजस्वीपर्व सुरू होईल, असे मानायला हरकत नाही, असे सांगतानाच भाजप आणि जेडीयूचा प्रचार केवळ बिहारच्या जंगलराजभोवती सुरू होता; पण १५ वर्षे बिहारमध्ये कोण सत्तेत होते? कुणाचे जंगलराज सुरू होते? असा सवाल त्यांनी केला. निकाल आल्यानंतर लोक जंगलराज विसरून जातील आणि बिहारमध्ये मंगलराज सुरू होईल, असा चिमटाही राऊत यांनी काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER