‘आम्ही टांग वर करतो तेव्हा भूमंडळ हलते’ – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : बिहार निवडणुकीत भाजपा (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरत असून आता मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतमोजणीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याने भाजपा नितीश कुमार (Nitish Kumar) यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी देणार की त्यावर दावा करणार यावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री झाल्यास नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत असं म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बिहारमध्ये भाजपाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं एका सूरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. कारण जो खेळ महाराष्ट्रात खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यावर आम्ही जो पलटवार केला त्यानंतर भाजपा आपल्या मित्रांशी तसं करणार नाही. शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपाला त्यांना करावंच लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बिहार निवडणुकीत नोटापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळाले. शिवसेनेची अवस्था गिरे तो भी टांग उपर अशी आहे, या भाजपच्या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आमची टांग नेहमी जागेवरच असते. जेव्हा आम्ही टांग वर करतो तेव्हा भूमंडळ हलते, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

काल सांगितल्याप्रमाणे तेजस्वी यादव हेच या निवडणुकीचे मॅन ऑफ दी मॅच आहेत. त्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाला नवी दिशा दिली आहे. या निवडणुकीत ते मुख्यमंत्री बनू शकले नाही. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठा चमत्कार करतील, तेजस्वीच्या रुपाने देशाला एक नवीन तरुण नेता मिळाला आहे, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER