सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर आम्ही नि:शब्द आहोत : संजय राऊतांचा टोला

sanjay-raut-slams-adv-vikas-singh-over-sushant-singh-rajput-case

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयाकडून सीबीआयकडे (cbi) सोपवण्यात आलेल्या रिपोर्टवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले . जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत. असे म्हणत राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे .

अगदी सुरुवातीपासूनच या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असेलल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा रिपोर्ट आहे. ज्यांचा कोणताही राजकीय संबंध नाही किंवा शिवसेनशी देखील संबंध नाही, असे संजय राऊत म्हणाले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सीबीआयला आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात त्यांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावत, त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. या अहवालानंतर, नवीन फॉरेन्सिक पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी सुशांतचे वकील विकास सिंह यांनी केली आहे. यावर ‘आता सीबीआयवरही विश्वास नाही का?’, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या वकिलांवरही निशाणा साधला.

सुशांतच्या वकिलांनी नव्या पथकाची मागणी केली आहे, करू द्या. केजीबी, सीआयएची टीम आणली तरी हरकत नाही. यांच्या या मागणीचा अर्थ, त्यांचा आता सीबीआयवरही विश्वास उरला नाहीय. सुप्रीम कोर्टवरदेखील विश्वास नाहीय. काय बोलणार आता!’, असे म्हणत संजय राऊत यांनी विकास सिंह यांना फटकारले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER