संजय राऊतांनी शिवसेनेचे खरे रूप दाखवले – बबिता फोगाट

Babita Fogat & Sanjay Raut

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणौत आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वादात ‘दंगल’ गर्ल बबिता फोगाटने राऊतांना टोमणा मारला – कंगनाला मुंबईत परत येऊ नको, असे धमकवून संजय राऊतांनी शिवसेनेचे (Shivsena) खरे रूप दाखवले! कंगनाने आरोप केला आहे की – संजय राऊत यांनी मला धमकी दिली आहे की – मुंबईत परत येऊ नको. यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले की, ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे त्यांना द्या.

कंगनाने ट्विट केले आहे – मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे? यानंतर बबिता फोगाट म्हणाली की – “कंगना राणौत ही हिंदुस्तानची कन्या आहे, मुंबईत येण्यापासून तिला रोखण्याची कुणाची हिंमत नाही.

संजय राऊतांनी असे म्हणून शिवसेनेचे खरे रूप दाखवले. बॉलिवूडमधील घाण साफ करण्याची गरज आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER