संजय राऊतांनी कंगनाची माफी मागावी, तृप्ती देसाई यांची मागणी

Sanjay Raut

मुंबई : अभेनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईचा अपमान केल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (संजय राऊत ) यांनी कंगनावर टीका करताना अपशब्द वापरल्याने भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे. देसाई यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

याबाबत बोलताना तृप्ती देसाई म्हणल्या की, कंगना राणौत यांनी मुंबई सुरक्षेबाबत ट्विट केलं होतं. त्यांना अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कंगना राणौत यांचं ट्विट चुकीचं होतं, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतच्या मदतीला केंद्र सरकार धावून आलं आहे. केंद्र सरकारने कंगना रनौतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना रनौतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER