संजय राऊत यांनी माफी मागावी ; दिया मिर्झाने केली कंगना रणौतची पाठराखण

Kangna Ranaut-Dia Mirza-Sanjay Raut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही कंगनावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली . यावर अभिनेत्री दिया मिर्झाने (Dia Mirza) कंगना रणौतची पाठराखण केली आहे . तसेच संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी असेही ते म्हणाली .

संजय राऊत यांनी हरामखोर हा अत्यंत चुकीचा शब्दप्रयोग केला आहे. सर, कंगनाने जे वक्तव्य केलं, त्यावर नाराजी व्यक्त करण्याचा किंवा त्यावर मत मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र अशी भाषा वापरल्याप्रकरणी तुम्ही माफी मागावी”, असे ट्विट दियाने केले आहे.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. तिन ट्विटरवरून देखील विविध व्यक्तींवर टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला .

ही बातमी पण वाचा : मुंबईचा अपमान सहन करणार नाही, रानौतने माफी मागितल्यास विचार करू – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER