शिवसेनेची कोणती मजबूरी आहे , संजय राऊत यांनी उत्तर द्यावं – प्रविण दरेकर

मुंबई: 25 ते 30 वर्षे भाजप – शिवसेना (BJP-Shivsena) युती होती. एकत्र लढले एकत्र राजकारण केलं. मग, तरीही एवढ्या वर्षाची युती तोडून शिवसेनेने राजकीय शत्रु असलेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. मग, काय 25, 30 वर्षे युतीत राहणे ही शिवसेनेची मजबूरी होती का असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना केला आहे.

तसेच, दरेकर म्हणाले, हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपाबरोबर शिवसेना होती, याचे उत्तर संजय राऊत यांना द्यावे लागेल. तसेच युतीमध्ये लढलो असताना, नैसर्गिक युती ही भाजपा बरोबर असताना त्यांना बाजूला ठेवून महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का..याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे.

सोयीप्रमाणे बोलणे हे जनतेला पसंत पडत नाही हे संजय राऊत यांच्या अलिकडच्या काळातील वक्तव्यावरून दिसून येते,” अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

दरम्यान, काल संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली. या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर, दुसरीकडे भाजप – शिवसेना दोन्ही पक्षातील नेते पुन्हा युती होण्याच्या चर्चेला अर्थ मिळेल अशी विधाने करत आहेत.

तर, महाविकास आघाडीचे समन्वयक शरद पवार यांनी मुक्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) बैठकीसाठी वर्षावर बोलावलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER