संजय राऊत, शिवरायांनी स्त्री आदर शिकवला त्यांचा मान – आदर राखा – केदार शिंदे

Sanjay Raut - Kedar Shinde

मुंबई : मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याबद्दल अभिनेत्री कंगना राणौतबाबत (Kangana Ranaut) शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगनाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला. या वादावर दिग्दर्शक केदार शिंदेंनी संजय राऊत याना आठवण करून दिली आहे – संजय राऊत, शिवरायांनी स्त्री आदर शिकवला त्यांचा मान – आदर राखा.

कंगनाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या संजय राऊत यांना केदार शिंदेंनी (Kedar Shinde) छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) आठवण करून दिली आहे. त्यांनी ट्विट केले – ‘कंगना राणौत मुंबई विषयी जे बोलल्या त्याविषयी निषेध केला. पण त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी उच्चारलेला शब्दही निषेधार्थ आहे. शिवरायांनी स्त्री आदर शिकवला. त्यांचा मान आदर राखला गेला पाहिजे,’ असं केदार शिंदेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यात, संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER