हा राजकीय नाही, लोकांचा जीव वाचवण्यासाठीचा लढा : संजय राऊत

Sanjay Raut

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे (Corona)संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दिवसाला एक लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. देशातील कोरोना परिस्थितीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संसदेत सविस्तर निवेदन केले . आरोग्य मंत्र्यांच्या निवेदनावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) निशाणा साधत अनेक सवाल उपस्थित केले.

“हा राजकीय लढा नाहीये, लोकांचा जीव वाचवण्यासाठी लढाई आहे,” अशी टीकाही राऊत यांनी केली.

संसदेत बोलताना संजय राऊत म्हणाले,”माझी आई आणि भावालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. आज धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृह्नमुंबई महापालिकेनं ((BMC) केलेल्या कामाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. काल काही सदस्यांनी महाराष्ट्रावर टीका केली, त्यामुळे मी हे सत्य सांगतोय,” असे संजय राऊत म्हणाले.

“मला सदस्यांना विचारायचं की असंख्य लोक कोरोनातून बरे कसे झाले? क्या लोग भाभीजी के पापड का करके ठीक हो गये? ही राजकीय लढाई नाहीये, तर लोकांचे जीव वाचवण्याची लढाई आहे,” अशा शब्दात राऊत यांनी टीकाकारांना उत्तर दिले.

ही बातमी पण वाचा : खासगीकरणाविरोधात शिवसेनेने लोकसभेत आवज उठवला ; संजय राऊत आक्रमण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER