उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आमचे डॉक्टर : संजय राऊत

Sanjay Raut - Sharad Pawar - Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज (५ डिसेंबर) लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर पुढील दोन दिवस संजय राऊत (Sanjay Raut) घरीच आराम करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेताना, डॉक्टरांनी काही सल्ले दिले आहेत का? असा प्रश्न केला असता त्यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) हेच आमचे डॉक्टर असून आता काँग्रेसदेखील सहभागी झाली आहे, असे विधान केले.

संजय राऊत हे सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत चाणक्य म्हणून ओळखले जातात. काही मागण्यांमुळे भाजपशी असलेला संसार मोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली. २०१९ निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात घडलेलं राजकीय नाट्य हे अविस्मरणीय आहे. या सर्व घडामोडींमागे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांचीदेखील महत्त्वाची भूमिका राहिली होती.

संजय राऊत यांना हृदयाचा आजार असून मागील वर्षी सत्तास्थापनेच्या घडामोडीतच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा ते या शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER